अयोध्या खटल्याचा निकाल सर्वांनी मान्य करावा : शरद पवार

गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (10:23 IST)
अयोध्येतील राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो सर्वांनी मान्य करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
 
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत ते बोलत होते. 
 
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन खटल्याचा अंतिम निकाल 9 नोव्हेंबर रोजी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार बोलत होते. या खटल्यावरील निकालानंतर देशात कोणतीही परिस्थिती उद्भवू शकते.
 
काही समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत सर्व नवनियुक्त आमदारांनी आपापल्या मतदारसंघात शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि संयम राखण्यासाठी प्रयत्नशील रहावे. या निकालाचा फायदा घेऊन असामाजिक तत्त्वे समाजात अशांतता निर्माण करणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती