मुलांची एकाग्रता वाढवणारे योगासन

बुधवार, 30 डिसेंबर 2020 (16:28 IST)
सध्या कोरोनामुळे मुलांची जीवनशैली बिघडलेली आहे. पालकांसाठी मुलांना अभ्यासाला बसवणे खूपच अवघड झाले आहे कारण ऑनलाईन वर्गात पूर्णपणे ते लक्ष देण्यात सक्षम नसतात आणि शिक्षकांसाठी देखील त्यांच्या कडे लक्ष देणं शक्य नसते. अशा परिस्थितीत पालक मुलांना अभ्यासासाठी बसवतात तर त्यांचे डोळे इकडे तिकडे फिरतच असतात. ते आई वडिलांच्या प्रश्नाचे व्यवस्थित उत्तरे देत नाही, जी खरोखर चिंतेची बाब आहे. पण या साठी घाबरून जाऊ नये. कारण आम्ही आपल्याला या समस्येचे निराकरण करण्यासाठी काही आसन सांगत आहोत. ज्या आसनांचा अभ्यास केल्याने मुलांमध्ये एकाग्रता वाढेल.
 
1 शीर्षासन - 
मुलांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे की दररोज किमान 1 मिनिटासाठी हे शीर्षासन करावे. या मुळे मुलांची स्मरण शक्ती वाढण्यासह बुद्ध्यांकाची पातळी देखील वाढते. हे डोळ्यांच्या दृष्टीसाठी देखील चांगले मानले आहे. हे करायला सोपे नाही पण भिंतीच्या साहाय्याने करण्याचा प्रयत्न केल्यावर हे करण्यात यश मिळण्यासह चांगले परिणाम मिळतात.
 
2 सर्वांगासन -
हे आसन केल्याने मुलांमध्ये एकाग्रता वाढते. अभ्यास करताना मुलांचे लक्ष पुन्हा-पुन्हा भटकत असेल तर त्याला दररोज 2 ते 3 मिनिटे सर्वांगासनाचा अभ्यास करवावा. हे करताना मुलाचे लक्ष आणि दृष्टी त्याच्या पाया कडे असावी. हे करताना त्रास होत असेल तर आपण हाताचा आधार देऊ शकता.किंवा भिंतीचा आधार देखील घेऊ शकता. हे शीर्षासन पेक्षा सोपे आसन आहे.
 
3 सूर्य नमस्कार- 
मुलं इतर कोणतेही आसन करू शकत नसल्यास त्यांच्या कडून सूर्य नमस्कार आवर्जून करवावे. सकाळी उठल्यावर त्यांनी सूर्य नमस्काराचे दोन ते तीन चक्र केले तर दिवसभर त्यांची एकाग्रता कायम राहते आणि मेंदू देखील लवकर काम करेल. सूर्य नमस्कार केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. ज्यामुळे मुलांच्या शरीरात दिवसभर चपळता राहते आणि ते दिवसभर न थकता अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यात सक्षम असतात.
 
4 वृक्षासन -
हे आसन करण्यासाठी झाडासारखी मुद्रा होते म्हणून ह्याला वृक्षासन म्हणतात. हे आसन करायला खूप सोपं आहे हे आसन मेंदूला एकाच ठिकाणी केंद्रित करण्यात मदत करतो आणि शरीरास लवचीक देखील बनवत. ज्या मुलांचे पाय थोड्याच अंतरावर चालल्यानंतर दुखू लागतात त्यांच्या साठी हे आसन एका उपचारासारखे आहे कारण हे पायांचे स्नायू बळकट करतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती