सूचना - 90 डिग्री अंशावर पोहचल्यानंतर पायाला झटका देऊन उचलू नये. पाय उचलताना गुडघ्यात वाकवू नये. नितंब उचलताना उजव्या व डाव्या बाजूला पाय झाल्यास मान आखडण्याची शक्यता असते. पाय नितंबाच्या रेषेत असावेत. ज्यांना उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, कमरेचे किंवा मानेचे दुखणे असेल त्यांनी हे आसन करु नये.
फायदा - या आसनाने पोट, यकृत, किडनी, मूत्राशय आदींना चांगला व्यायाम होतो. यासंदर्भातील आजारावरही हे आसन प्रभावी आहे. रक्तशुद्धी होण्यास मदत होते.