लिंग मुद्रा

ND
लिंग किंवा अंगठा मुद्रा पुरुषत्वाचे प्रतीक मानले जाते. यावरून या योग मुद्रेला लिंग मुद्रा म्हटले जाते.

विधी- दोन्ही हाताचे बोटे एकमेकामध्ये घट करून घ्या. त्यानंतर उरलेले दोन्ही अंगठ्यांमधील एक सरळ ताठ करावे. असे केल्याने शरीरात विशिष्‍ट प्रकारची उर्जा उत्पन्न होत असते.

लाभ- लिंग मुद्रा नियमित केल्याने छातीमध्ये जमा झालेला कफ व छाती जळण्यावर आराम मिळतो. तसेच आपल्या फुफ्फुसाना शक्ती करण्‍यात लिंग मुद्रा खूप फायदेशीर आहे. दररोज लिंग मुद्रा केल्याने आपल्यात स्फूर्ति व उत्साह संचार होत असतो. आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी नाहीशी होऊन लठ्ठपणा कमी करण्यासाठी लाभदायक ठरते.

सावधगिरी- लिंग मुद्रा करण्यापूर्वी योग शिक्षकाचा सल्ला घ्यावा. लिंग मुद्रा आवश्यकतेनुसारच केली पाहिजे. लिंग मुद्रा केल्यानंतर भरपूर पाणी प्यावे.

वेबदुनिया वर वाचा