भाजप व शिवसेना यांची गेली 25 वर्षे अस्तित्वात असलेली युती तुटली असली तरी महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या निवडणुकीमध्ये महायुतीला निश्चित बहुमत मिळेल, अशी ग्वाही केंद्री अन्नमंत्री लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी बुधवारी येथे मीडिाशी बोलताना दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेबाबत मवाळ धोरण स्वीकारले असून ते आपल्या भाषणामध्ये शिवसेनेवर टीका करण्याचे कटाक्षाने पाळत असतात. त्यामुळे दुरावलेली शिवसेना विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीबरोबर आघाडी करेल, असा विश्वास पासवान यांनी व्यक्त केला आहे.