पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरली आहे. मनसेने राज्यातील 153 मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांचा पक्ष मनसेने 153 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात सर्व विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. राज ठाकरेंनी आपल्या उमेदवारांची यादी पक्षाच्या वेबसाईटच्या माध्यमातून जाहीर केली आहे. याच बरोबर सायंकाळी राज ठाकरे मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाराष्ट्राच्या विकासाची 'ब्ल्यू प्रिंट' सादर करणार आहेत.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून ड्रीम प्रोजेक्ट जनतेसमोर मांडला.जागावाटपावरून सेना-भाजपमधील युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी घटस्फोटाच्या मार्गावर असल्याचे भाकीतही राज ठाकरे यांनी मांडले. त्यांनतर लागलीच भाजपने पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसोबतची 25 वर्षांची मैत्री तोडल्याचे स्पष्ट केले.
मनसेच्या या पहिल्या यादीत विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शालिनी ठाकरे, शिशिर शिंदे, मंगेश सांगळे, प्रकाश भोईर, प्रवीण दरेकर, नितीन सरदेसाई, वसंत गिते यांचा समावेश आहे.
मनसेची यादी पुढीलप्रमाणे...
मतदारसंघ आणि उमेदवार
नंदूरबार - गुलाबसिंग वसावे
नवापूर - महादेव वसवे
धुळे ग्रामिण - अजय माळी
रावेर - जुगल पाटील
भुसावळ (एससी) - रामदास सावकारे
जळगाव शहर - ललित कोल्हे
एरंडोल - नरेंद्र पाटील
चाळीसगाव - राकेश जाधव
पाचोरा - दिलीप पाटील
बुलढाणा - संजय गायकवाड
चिखली - विनोद खरपास
शिंदखेड राजा - विनोद वाघ
जळगाव जामोद - गजानन वाघ
अकोट - प्रदीप गणेशराव गावंडे
अकोला पश्चिम - पंकज साबळे
मुर्तिजापूर (एससी) - रामा उंबरकर
रिसोड - राजू राजेपाटील
धामणगाव, मोर्शी - ज्ञानेश्वर धानेपाटील
तिवसा - डॉ. आकाश वऱ्हाडे
दर्यापूर (एससी) - गोपाल चंदन
अचलपूर - प्रवीण तायडे
हिंगणघाट - अतुल वंदिले
वर्धा - अजय हेडाऊ
काटोल - दिलीप गायकवाड
हिंगणा- किशोर सराइकर
नागपूर मध्य - श्रावण खापेकर
नागपूर पश्चिम - प्रशांत पवार
तुमसर - विजय शहारे
भंडारा (एससी) - मनोहर खरोले
तिरोरा - दिलीप जयस्वाल
गडचिरोली - मीनाताई कोडाप
राजूरा - सुधाकर राठोड
बल्लारपूर - अॅड. हर्षल चिपळुणकर
चिमूर - अरविंद चांदेकर
वरोरा - डॉ. अनिल बुजोणे
वणी - राजू उंबरकर
उमरखेड (एससी) - मारोजी कानबाजी संकुलवाड
किनवाट - धनलाल पवार
भोकर - माधव जाधव
नांदेड उत्तर - दिलीप ठाकूर
नांदेड दक्षिण - प्रकाश मारावार
लोहा - रोहीदास चव्हाण
देगलूर (एससी) - सुर्यवंशी पार्वतीबाई इरबा
कळमनुरी - सुनिल अडकीने
हिंगोली - ओमप्रकाश कोटकर
जिंतूर - खेडराव आघाव
गंगाखेड - बालाजी देसाई
पाथरी - हरिभाऊ लहाने
पारतूर - बाबासाहेब आकात
घनसावंगा - सुनिल आर्दंड
जालना - रवी राऊत
बदनापूर (एससी) - ज्ञानेश्वर गायकवाड
भोकरदन - दिलीप वाघ
सिल्लोड - दिपाली काळे
कन्नड - सुभाष पाटील
फुलंब्री - भास्कर गाडेकर
औरंगाबाद मध्ये - राज वानखेडे
औरंगाबाद पूर्व - सुमित खांबेकर
पैठण - सुनिल शिंदे
वैजापूर - कल्याण दांगोडे पाटील
मालेगाव आऊटर - संदीपबापू पाटील
नाशिक मध्य - वसंत गिते
नाशिक पश्चिम - नितीन भोसले
डहाणू (एसटी) - विजय वाडिया
विक्रमगड (एसटी) - भरत हजारे
नालासोपारा - विजय मांडवकर
भिवेडी ग्रामीण (एसटी) - दशरथ पाटील
शहापूर (एसटी) - प्रा. ज्ञानेश्वर तळपदे
कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर
अंबरनाथ (एससी) - डॉ. विकास कांबळी
कल्याण पूर्व - नितीन निकम
ओवळा माजिवडा - सुधाकर चव्हाण
बेलापूर - गजानन काळे
बोरिवली - नयन कदम
मागठाणे - प्रविण दरेकर
मुलुंड - सत्यवान दळवी
विक्रोळी - मंगेश सांगळे
भांडुप पश्चिम - शिशिर शिंदे
जोगेश्वरी (पूर्व) - भालचंद्र अंबुरे
दिंडोशी - शालिनी ठाकरे
कांदिवली पुर्व – अखिलेश चौबे
चारकोप – दिपक देसाई
अंधेरी पश्चिम – रईस लष्करीया
अंधेरी पुर्व – संदिप दळवी
विलेपार्ले – सुहास शिंदे
चांदिवली – ईश्वर तायडे
घाटकोपर (पश्चिम) – दिपील लांडे
घाटकोपर (पूर्व) – सतिश नारकर
कुर्ला (sc) – स्नेहल जाधव
कलिना – चंद्रकांत मोरे
सायन कोळीवाडा – बाबा कदम
वडाळा – आनंद प्रभु
माहिम – नितीन सरदेसाई
वरळी – विजय कुडतडकर
भायखळा – संजय नाईक
मलबार हिल – अॅड. राजेंद्र शिरोडकर
मुंबादेबी – इम्तियाज अमीन
पनवेल – केसरी पाटील
कर्जत - जे. पी. पाटील
उरण – अतुल भगत
पेण – गोवर्धन पोलसानी
महाड – सुरेंद्र चव्हाण
जुन्नर – शरद सोनावणे
खेड आळंदी – समीर ठिगळे
शिरुर – संदीप भोंडवे
दौंड – राजाभाऊ तांबे
पुरंदर – बाबा जाधवराव
भोर – संतोष दसवडकर
चिंचवड – अनंत कोराळे
कोथरुड – किशोर शिंदे
खडकवासला – राजाभाऊ लायगुडे
पर्वती - जयराज लांडगे
हडपसर - नाना भानगीरे
पुणे कॅन्टोमेन्ट(अ.ज.)अजय तायडे
कसबा पेठ - रविंद्र धंगेकर
नेवासा - दिलीप मोटे
शेवगांव - देविदास खेडकर
पारनेर - मोहन शंकर रांधवन
अहमदनगर शहर - वसंत लोढा
गेवराई - राजेंद्र मोटे
माजलगांव - भगवान सरोदे
बीड- सुनील धांडे
आष्टी- वैभव काकडे
केज - यशवंत उजगरे
लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
अहमदपूर- ओम रामलिंगप्पा पुर्णे
उदगीर (एससी)- अॅड.शिवाजीराव कोकणे
निलंगा - अभय साळुंखे
औसो-बालाजी गिरे
उमरगा-विजय क्षीरसागर
तुळजापूर-अमर कदम
उस्मानाबाद(एससी) संजय यादव
परांडा-गणेश शेंडगे
करमाळा-जालिंदर जाधव
मोहोळ (अ.ज.) - दीपक गवळी
सोलापूर शहर उत्तर - अनिल व्यास
अक्कलकोट - फारूक शाब्दी
माळशिरस - किरण साठे
कोरेगांव - युवराज पवार
माण - धैर्यशील पाटील
कराड उत्तर - राजेंद्र केंजळे
कराड दक्षिण - अॅड.विकास पवार
पाटण - रवींद्र शेलार
दापोली - वैभव खेडेकर
सावंतवाडी - परशुराम उपरकर
चंदगड - दिवाकर पाटील
करवीर - अमित पाटील
शिरोळ - विजय जयसिंग भोजे
सांगली (एससी) स्वाती शिंदे
खानापूर - भक्तराज ठिगळे
तासगांव-कवठेमहांकाळ - सुधाकर खाड्ये
जत - भाऊसाहेब कोळेकर