Old Age Pension Scheme Maharashtra 2022: महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजना ,पात्रता, लाभ, अर्ज कसा करावा जाणून घ्या

शुक्रवार, 10 जून 2022 (22:39 IST)
Old Age Pension Scheme Maharashtra 2022: वृद्धावस्था पेंशन योजना महाराष्ट्र 2022  देशातील प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यातील वृद्धांना मदत करण्यासाठी वृद्धापकाळ पेन्शन योजना सुरू केली आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट सरकार ने राज्यातील 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व वृद्धांसाठी महाराष्ट्र वृद्धापकाळ पेंशन योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत आर्थिक मदत म्हणून वृद्धांना ठराविक रक्कम दिली जाईल. या योजने अंतर्गत सर्व असहाय व आर्थिक दुर्बल वृद्धांना दरमहा 600 रुपये दिले जातील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार.अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे इत्यादींची माहिती जाणून घ्या.
 
वृद्धापकाळ निवृत्ती वेतन महाराष्ट्र 2022 -सरकारने सुरू केलेल्या या योजनेंतर्गत लाभार्थीला दरमहा 600 रुपये पेन्शनची रक्कम दिली जाते. 65 वर्षांवरील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ महिला वयोवृद्ध व वृद्ध पुरुष घेऊ शकतात. लाभार्थ्याला दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. 
 
वृद्धापकाळ योजनेची उध्दिष्टये -
 वृद्धापकाळ पेन्शन योजना महाराष्ट्र 2022 चा मुख्य उद्देश राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे हा आहे. वृद्धापकाळात असहाय्य व गरीब असलेल्या सर्व वृद्धांच्या आर्थिक मदतीसाठी शासनामार्फत चालविण्यात येणारी या योजनेचा उद्दिष्टये उदरनिर्वाहासाठी इतरांवर अवलंबवून राहावे लागते.आणि घरातून किंवा बाहेरून मदत मिळाली नाही तर त्यांना दोन वेळचे जेवण देखील मिळत नाही. त्यासाठी राज्यसरकार ने आणि केंद्रसरकारने वृद्धापकाळ पेन्शन योजना सुरु केली आहे. त्यातून त्यांना महिन्यानिहाय पेन्शन म्हणून ठराविक रक्कम दिली जाईल. ही रक्कम ते त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकतात. ही रक्कम 600 रुपये असून त्यापैकी 200 रुपये केंद्र सरकार आणि 400 रुपये राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल वृद्धांना देणार आहेत.
 
या योजनेचे लाभ-
* या योजनेचा लाभ राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.
* योजनेंतर्गत लाभार्थींना दरमहा 600 रुपये पेन्शन दिली जाईल.
* योजनेचा लाभ घेऊन राज्यातील ज्येष्ठ नागरिक स्वावलंबी होतील.
* या योजनेची पात्रता पाळणारे 60 वर्षांवरील राज्यातील सर्व लोक या योजनेत अर्ज करू शकतात.
 
योजनेसाठी पात्रता-
* अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असावी.
* अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
* अर्ज करणाऱ्या व्यक्तीने या योजनेच्या सर्व पात्रतेचे पालन केले पाहिजे.
* राज्यातील महिला व पुरुष वृद्धांना या योजनेचा लाभ घेता येईल.
* अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.50,000 पेक्षा जास्त नसावे.
* या वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील गरीब ग्रामीण कुटुंबातील वृद्धांना प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे ज्यांच्याकडे बीपीएल कार्ड आहे ते या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील.
 
 
लागणारी आवश्यक कागदपत्रे -
* अर्जदाराचे आधार कार्ड
* अर्ज करणाऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
* लाभार्थीच्या बँक पासबुकची छायाप्रत
* अर्जदाराचे वय प्रमाणपत्र
* ओळखपत्र
* अर्जदाराचा मोबाईल क्रमांक
* अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
* बीपीएलच्या यादीत आल्यास त्याची प्रतही आवश्यक आहे.
 
ऑनलाईन कसा अर्ज करावा?
* तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि या योजनेत अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर यावे लागेल .
* वेबसाइटवर आल्यानंतर तुम्हाला वृद्ध पेन्शन योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
* क्लिक केल्यानंतर, एक नवीन पृष्ठ उघडेल, या पृष्ठावर आपल्याला अर्जाचा फॉर्म दिसेल.
* या फॉर्ममध्ये, तुम्हाला विनंती केलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल, त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
 
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी -
* सर्वप्रथम तुम्हाला अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालयात जावे लागेल.
* तेथे जाऊन तुम्हाला वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभार्थी होण्यासाठी अर्ज भरावा लागेल.
* आता फॉर्ममध्ये सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
* त्यानंतर तुम्हाला तेथे फॉर्म सबमिट करावा लागेल.
* अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
* तुमच्या अर्जासोबत दिलेली माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
छाननीनंतर, जर तुम्ही या योजने अंतर्गत पात्र ठरलात तर तुमचे पेन्शन सुरू होईल.
 
हेल्पलाइन क्रमांक-
आपण टोल फ्री क्रमांक – 1800 120 8040 वरून माहिती मिळवू शकता.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती