स्वाईन फ्ल्यू पूर्णपणे बरा होऊ शकतो

MH News
MHNEWS
स्वाईन फ्ल्यू अर्थात इन्फल्युएंझा ए (एच १ एन १) या साथीवर मात करता यावी यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. टॅमीफ्लू या औषधाचा पुरेसा साठा आणि इतर आरोग्य सुविधा संबंधितांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शासन यंत्रणेला जनतेचं सहकार्य अपेक्षित असून त्यामुळे या साथीवर आपण नक्कीच मात करू शकतो.

इन्फ्लूएन्झा व्हायरस काय आहे?
1. हा विषाणूमुळे होणारा आजार आहे .

2. याचा संसर्ग एका माणसापासून दुसर्‍या माणसाला होतो .

हे करा...

1. हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत .

2. पौष्टिक आहार घ्यावा .

3. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी -व्हिटॉमिन असलेल्या पदार्थांचा आहारात वापर करावा.

4. खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा.

5. भरपूर पाणी प्यावे.

6. पुरेशी झोप घ्यावी.

लक्षणे:

1. ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे.

2. अतिसार, उलट्या होणे.

3. श्वास घेण्यास त्रास होणे.

हे टाळा :

1. हस्तांदोलन अथवा आलिंगन.

2. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.

3. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे.

4. धुम्रपान करणे.

5. गर्दीमध्ये जाणे.

6. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात दूर राहावे.

ज्यांना लागण झाली आहे ते, त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आणि त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनीच 'एन-९५ मास्क' वापरावेत इतरांनी साधे मास्क किंवा हातरूमाल वापरावेत.
(महान्यूज)

वेबदुनिया वर वाचा