सुशील कुमारला कुस्‍तीत कांस्‍य

वेबदुनिया

बुधवार, 20 ऑगस्ट 2008 (16:24 IST)
अस्‍सल भारतीय मातीतल्‍या कुस्‍ती या खेळात 1952 नंतर का असेना भारताला कास्‍य पदक मिळाले आहे. बिजींग ऑलम्पिकमध्‍ये हरियाणातील सुशीलकुमार याने 66 किलोग्राम वजन गटात रेबोचार्ज प्रकारात हा सामना झाला. केवळ कांस्‍य पदकासाठी होणा-या या सामन्‍यात सुशीलने कजाकिस्‍तानच्‍या पैलवानाला पराभूत केले.

सुवर्ण व रौप्य पदकासाठीचे मल्ल नक्की झाल्यानंतर रेबोचार्जचा सामना खेळविला जातो. या दोघांनी हरविलेल्या मल्लांत कास्य पदकासाठी झुंज लागते.

त्यानुसार आज सुशील ज्या पहिलवानाकडून पराभूत झाला तो फायनलमध्ये गेला. सहाजिकच रेबोचार्जच्या लढतीसाठी सुशीलकुमारचे नाव पुढे आले. रेबोचार्जमध्ये सुशीलने रशियाच्या बैत्रोव या मल्लाला ३ पैकी २ राऊंड जिंकून लोळविले. कास्य पदकासाठी त्याला कझाकिस्तानाच्या पहिलवानाला पराभूत करायचे होते.

यासंदर्भातील नियमांची फारशी माहिती नसल्याने कुस्तीत राजीव तोमरचेच आव्हान राहिले असे वाटत होते. पण तसे नव्हते. कास्य पदक जिंकून सुशीलने भारताला सुखद धक्का दिला आहे.

आता १२० किलो वजनी गटात राजीव तोमरकडून पदकाची अपेक्षा आहे.

वेबदुनिया वर वाचा