दीपक पुनिया व्यतिरिक्त इतर कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 23 जानेवारी रोजी एमसी मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली एक देखरेख समिती स्थापन केली होती. ज्यामध्ये कमांडर राजेश राजगोपालन, राधिका श्रीमन, बबिता फोगट, योगेश्वर दत्त आणि तृप्ती मुरुगुंडे यांचा समावेश होता. कुस्तीपटूंनी आरोप केले असले तरी पीडितांची नावे समितीला सांगितली नसल्याचे सूत्रांकडून समजते. मंत्रालयाकडून कुस्ती संघटनेचे दैनंदिन कामकाज पाहण्याची जबाबदारीही या समितीला देण्यात आली होती. चार आठवड्यांत चौकशी अहवाल सादर करायचा होता, मात्र आणखी दोन आठवडे देण्याची विनंती मंत्रालयाला केली, ती मंजूर झाली.