मेस्सीच्या गोलमुळेच बार्सिलोनाचा पराभव टळला

लिओनेल मेस्सीने केलेल्या अप्रतिम गोलमुळेच बार्सिलोना संघाला ला लीग फुटबॉल सामान्यात व्हिलारिअलविरूद्धचा सामना 1-1 असा बरोबरीत राखता आला. मात्र, या सामन्यातील बरोबरीमुळे रिअल माद्रिदला मागे टाकण्याच्या त्यांच्या आशा दुरावल्या आहेत.
 
बार्सिलोनाला नवीन वर्षांतील पहिल्या लढतीत नुकताच अॅथलेटिक बिलबाओ संघाविरूद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यातही त्यांच्यावर व्हिलारिअलविरूद्ध पराभवाची वेळ आली होती. मात्र, शेवटच्या मिनिटाला बार्सिलोनाला मिळालेल्या फ्री किकद्वारा मेस्सीने अचूक गोल करीत संघावरील पराभवाची नामुष्की टाळली. व्हिलारिअल संघाकडून निकोल सॅन्सोन याने सुरेख गोल करीत संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. या सामन्यात दोन्ही संघांना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या होत्या तथापि त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही.

वेबदुनिया वर वाचा