सर्व ज्योतिषग्रंथांव्यतिरिक्त महर्षी पराशर आणि वराहमिहिरांच्या शास्त्रांमध्येही काल सर्प दोषाचे वर्णन आढळतं. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू यांच्या मध्य ग्रह येतात, तेव्हा काल सर्प दोष होतो.
या दिवशी, विशेषत: शिव मंदिरात, शिव गायत्री मंत्राचा जप करून आणि चांदी, सोने किंवा तांब्याच्या नाग-नागिनची जोडी अर्पण करून काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते.
नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिरात 21 चंदन उदबत्ती आणि 5 तेल किंवा तुपाचे दिवे लावून शिव गायत्री मंत्राचा जप केल्यास निश्चितच शुभ फळ प्राप्ती होते. नाग देव सोबत भोलेनाथला धन, संपत्ती, समृद्धी, ऐश्वर्य, सौभाग्य, वैभव, यश, प्रगती आणि संतान सुखाचं आशीर्वादही मिळतात.