धन प्राप्ती व सुख समृद्धीसाठी श्रावणातील 7 सोपे उपाय

व्यस्ततेमुळे आपण पूजेसाठी अधिक वेळ देऊ शकत नसाल तर काही सोपे उपाय करून आपण इच्छित फळ प्राप्त करू शकता.
 
1. श्रावणात नदी किंवा तळावात मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला. हे करताना महादेवाचे नाव घेत राहावे. याने धनप्राप्ती होते.
 
2. घरगुती समस्या, कौटुंबिक वाद इतर समाधानासाठी श्रावणात रोज सकाळी घरात गोमूत्र शिंपडावे व गूगलची धूप द्यावी.
 
3. विवाहात अडथळे येत असल्यास दररोज महादेवाच्या पिंडीवर केशर मिसळलेलं दूध अर्पित करावे. लवकर विवाह जुळेल.
 
4. श्रावणात दररोज 21 बेलाच्या पानांवर चंदनाने 'ॐ नम: शिवाय' लिहून पिंडीवर अर्पित करावे. याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
 
5. श्रावणात गरिबांना भोजन करवावे. याने आपल्या घरात कधीच अन्नाची कमी भासणार नाही आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल.
 
6. श्रावणात दररोज सकाळी स्नान करून महादेव मंदिरात जावे आणि महादेवाला अभिषेक करावे. काळे तीळ अर्पित करावे. नंतर मंदिरात बसून 'ॐ नम: शिवाय' मंत्राचा जप करावे. मानसिक शांती लाभेल.
 
7. श्रावणात दररोज नंदी (बैल) ला हिरवा चारा खाऊ घालावा. याने जीवनात सुख-समृद्धी नांदेल आणि मन प्रसन्न राहील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती