दीप अमावस्या या अमावस्येला आषाढ अमावस्या, दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून ही ओळखले जाते. यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात 4 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. यंदा श्रावण महिना 5 ऑगस्टला सुरू होणार आहे.
देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे.
यम, शनी, राहू आणि केतू यांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी दीपदान करावे.
घरगुती वाद आणि त्रास टाळण्यासाठी दीपदान करावे.
जीवनातून अंधार दूर होऊन प्रकाश येतो, म्हणूनच आपण दीपदान करतो.
धन समृद्धी कायम राहो, म्हणूनच दीपदान करावे.
दिवा लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा, दान यांचे फळ प्राप्त होते.