Sharad Purnima 2024: शरद पौर्णिमापासून शरद ऋतुची सुरुवात होते असे मानले जाते ज्याचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या धार्मिक ग्रंथांमध्ये असे वर्णन केले आहे की या शुभ दिवशी देवी लक्ष्मी आणि चंद्र देवाची उपासना करून प्रत्येक व्यक्तीला शुभ परिणाम मिळतो. या दिवशी रात्री चंद्रप्रकाशात चंद्रदेवाची पूजा केल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्य चांगले राहते.
शरद पौर्णिमा उपाय
शरद पौर्णिमेच्या दिवशी स्वतःच्या हाताने घरीच खीर किंवा आटीव दूध तयार करा. रात्री चांदीच्या भांड्यात काढून चांदण्यात ठेवा. शक्य असल्यास त्यात चांदीचे नाणे ठेवा. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर मनोभावे ती म्हणा. दूध रात्रभर चंद्रप्रकाशात राहू द्या. दुसऱ्या दिवशी देवी-देवतांची पूजा केल्यानंतर प्रसाद म्हणून ग्रहण करा. संपूर्ण रात्र ठेवणे शक्य नसल्यास चंद्राला नैवेद्य दाखवून तेथे बसून ॐ चन्द्रमसे नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. नंतर प्रसाद ग्रहण करा. या उपायाने तुमच्या जीवनात सुख-शांती नांदेल. याशिवाय मनोकामना पूर्ण होण्यासोबतच आरोग्यही चांगले राहील.