श्री साई बाबांचे गुरु पाठाचे अभंग
 
	
		
			 
										    		गुरूवार,  23 नोव्हेंबर 2023 (06:39 IST)
	    		     
	 
 
				
											अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह
	श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय ….
 
									
				
											
	 
	साईनाथ गुरु माझे आई
	मजला ठाव द्यावा पाई
	दत्ताराज गुरू माझे आई
	मजला ठाव द्यावा पाई
 
									
				
											
	 
	जयाची ती रूपे सगुण निर्गुण
	ऐसा नारायण वंदू आधी
	सगुण सेविता निर्गुण ये हाती
 
									
				
											
	निर्गुणाची प्राप्ती आरंभींना
	 
	आधी मुलं काढी क ख बाराखडी
	मग शब्द जोडी झाल्या ज्ञान
 
									
				
											
	गणू म्हणे तैसी सगुणोपासना
	बाराखडी जाणा अध्यात्माची
	 
	तिही बाराखडी शिकवी जो गुरु
 
									
				
											
	भावाभिचे तारू तोच जाणा
	गुरु सेवा हिच प्रथम पायरी
	असे टिकणे भारी अवघड
	 
	सद्गुरू रायाची कृपा संपादिता
 
									
				
											
	सेवेची पूर्तता सहज होई
	गणू म्हणे केल्या प्रसन्न सविता
	प्रभेची न्यूनता केवि पडे
 
									
				
											
	 
	सद्गुरू ची सेवा बहुतांनी केली
	ऐसी साक्ष दिधली (2) पुराणांनी
	पूर्णब्रह्म राम जानकीचा कांत
 
									
				
											
	झाला शरणागत (2) वशिष्ठाशी
	 
	रुक्मिणी वलभे केला सांदिपनी
	आपणाला गुणी (2) गुरुराय
 
									
				
											
	गणू म्हणे गुरु वाचुनी या नर
	तो ची जाण खर (2) दो पायांचा
	 
	निष्ठावंत भाव हाच देतो फळ
 
									
				
											
	अभक्तिचा मळ (2) निमालिया 
	चहाड दू तोंड्या ऐसा नारदमुनी
	तरी झाला तरणी (2) प्रह्लादाते
 
									
				
											
	 
	गोपी चन्दे गुरु नीतीशी काढिला
	पुढें तोची झाला (2) वंद्य त्याते
	गणू म्हणे सोने चढे मोला अंगे
 
									
				
											
	कसोटीच्या संगे (2) जगा माझी
	गणू म्हणे सोने चढे मोला अंगे
	 
	क्षमा, शांती, दया असे जया ठायी
 
									
				
											
	तसे ज्ञान पाही संपूर्ण ते
	जयाचीये शिरी ईश्वराचा हात
	तोच सद्गुरूनाथ करावा हो
	बाहेरील सोंगा भुलू नका कदा
 
									
				
											
	पंतगाते दगा दीपा पाशी
	 
	गणू म्हणे हंस पाण्याते टाकुनी
	घेत असे शोधूनी जैसे दूध
 
									
				
											
	 
	हिरे आणि गारा हे त्याचे खाणीत
	तैसे बद्ध मुक्त जगा माझी
	 
	पारखीतो येता ही राधे वेचुनी
 
									
				
											
	कुक्कुट पायानी कालवितो
	मुमुक्षु पारखी चार वाक कोंबडा
	कुक्कुटा उकिरडा गोड वाटे
	 
 
									
				
											
	गणू म्हणे जो का असे भाग्यवंत
	त्याचाच हेत गुरु पायी
	 
	क्षमा शांती युक्त भावाभिचे जहाज ..
 
									
				
											
	ऐसा सद्गुरू राज शिर्डी माझी
	क्षमा शांती युक्त भावाभिचे जहाज ..
	ऐसा सद्गुरू राज शिर्डी माझी
 
									
				
											
	 
	नामा भिता जयाची शोभे बाबा साई ..
	अनाथांची माई तिचं जाण
	नामा भिता जायची शोभे बाबा साई ..
 
									
				
											
	अनाथांची माई तिचं जाणा
	 
	अनाथ सनाथ आन भेद जेथे ..
	सुर्यप्रकाशाते निवड तैची
	अनाथ सनाथ आन भेद जेथे ..
 
									
				
											
	सुर्यप्रकाशाते निवड तैची
	 
	माझा गुरुराज जान्हवीचे जळ ..
	गणू अर्पी भाळ तया पायी
 
									
				
											
	माझा गुरुराज जान्हवीचे जळ ..
	गणू अर्पी भाळ तया पायी
	 
	अंगकाठी उंच केलीसी धारण ..
 
									
				
											
	कळवावया खूण भक्तजना
	अंगकाठी उंच केलीसी धारण ..
	कळवावया खूण भक्तजना
	 
	उच्च ज्ञान जिका अध्यात्म साजीरे ..
 
									
				
											
	तेची सेवा सारे कल्याणार्थ
	उच्च ज्ञान जीक अध्यात्म साजीरे ..
	तेची सेवा सारे कल्याणार्थ
 
									
				
											
	 
	परी नका सोडू – पेंगणे ली लता ..
	नये थोर होता पाल्याविण
	परी नका सोडू – पेंगणे ली लता ..
 
									
				
											
	नये थोर होता पाल्याविण
	 
	गणू म्हणे बाळ तांबूस सावळा ..
	सगुरूची लीला अगाधाची
 
									
				
											
	गणू म्हणे बाळ तांबूस सावळा ..
	सगुरूची लीला अगाधाची
	 
	सद्गुरुरायानी जला तेल केले
 
									
				
											
	दीप उजाळेले लक्षावधी
	 
	ठेऊनीया दीप उषा पायथ्याशी
	पहुडे फलीसी गुरुमूर्ती
 
									
				
											
		त्याच्या त्या कृतीचा हाच आहे अर्थ
		कदा अंधारात निजू नये
		 
	गणू म्हणे माया दुधर्र अंधार
 
									
				
											
	ज्ञानदिप थोर म्हणुनी लावा
	 
	शिव , विष्णू , ब्राह्म रूप बाबा साई
	भाव दुजा काही मानू नका
 
									
				
											
	भाव दुजा काही मानू नका
	 
	सदगुरु रायाची पायचीजी धूळ
	तेच गंगाजळ शुद्ध माना
	 
 
									
				
											
	अमृता आगळी मुखीची वचने
	तिच माना मने गीता जेवी
	 
	गणू म्हणे बाबा वसंत सोज्वळ
 
									
				
											
	भक्तांनो कोकिळ व्हारे तुम्ही