रिया किशोर बिहाडे (12), काव्या धम्मपाल भगत(11) असे या मयत मुलींची नवे आहे. रिया आणि काव्य या आते-मामे बहिणीं होत्या. काव्या आपल्या मामाकडे किशोर बिहाडे यांच्या कडे दिवाळीच्या सुट्टीत आली होती. आई व मामा सोबत ती जेतवन पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी आली. रिया व काव्या या दोघी परिसरात खेळत असताना त्या तलावात पडल्या आणि बुडू लागल्या. त्यांना बुडताना किशोर बिहाडे यांच्या लहान भावाने पहिले त्याने दोघींना बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरु केली. तिथे असलेल्या काही तरुणांनी त्यांना बाहेर काढण्यात मदत केली.