मंगळवारी सकाळी बोराडे परिवार व काही कामगार मळ्यात जात असतांना त्याना वावरात लावलेल्या नेट च्या बाजूने जनावर जाताना दिसले. सुरवातीला त्यांना ते रानडुक्कर असेल असे वाटले. मात्र मजुराने काही अंतरावरून पाहिले असता तो मादी जातीचा बिबट्या व सोबत एक पिल्लू असल्याचे दिसल्याने सर्वांनी तेथून पळ काढला.