राजकुमार रमेशचंद्र सारडा (मूळ रा. महावीर नगर, गुजराथी हायस्कूल जवळ सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या हळद व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीचा हळद व्यापारी राजकुमार सारडा याने सातारा तालुक्यातील मर्ढे येथील ११ शेतकऱ्यांची तब्बल ३२ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असतानाच आता जांबच्या शेतकऱ्यांनीही भुर्इंज पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.