महाराष्ट्राच्या राजकारणाचे खरे 'खलनायक' देवेंद्र फडणवीस - संजय राऊत

गुरूवार, 6 जून 2024 (12:05 IST)
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीच्या पार्शभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे.
 
फडणवीसांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "राजकारणात अशी नाटकं होत राहतात. मोदी देखील अशा पद्धतीची नाटकं करत असतात. मोदी कधी रडतात, कधी हसतात, कधी पळतात, तर कधी खाली बसतात. हे सगळे नेते त्यांचेच 'चेले' आहेत. महाराष्ट्राने फडणवीसांचं नेतृत्व नाकारलं आहे."
 
संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजकारणाचे खलनायक जर कुणी असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीसांमुळेच महाराष्ट्रात भाजपला वाईट दिवस आले आहेत.
 
महाराष्ट्र हा त्याच्या सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जात होता पण देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने बदल्याचं राजकारण केलं, कुटील डाव रचले. महाराष्ट्राच्या राजकारणात विष कालवण्याचं काम फडणवीसांनी केलं आणि त्याचीच फळं त्यांना मिळत आहेत."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती