प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून चढू किंवा उतरू नये. असे आवाहन आणि सूचना वारंवार रेल्वे कडून देण्यात येतात तरी ही आपला जीव धोक्यात घालत काही बेजबाबदार प्रवाशी चालत्या रेल्वेतून चढ उतर करतात. काहींचे नशीब बलवत्तर असतात की ते रेल्वेत चढताना किंवा उतरताना पडल्यावर वाचतात. पण सर्वांचे नशीब बलवत्तर नसते. आणि अशा परिस्थितीत काही जणांना आपले प्राण गमवावे लागतात.
एक 26 वर्षाचा नितीन नावाचा तरुण वर्धा रेल्वे स्थानकावर अकोल्याला जाणारी सुपरफास्ट ट्रेनची वाट पाहत उभा होता. ट्रेन आली आणि तरुण त्याला पकडण्यासाठी धावला आणि धावत धावत ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात फलाट आणि रेल्वेच्या मध्ये पाय घसरून पडला आणि अडकला. हे दृश्य पाहून इतर प्रवाशी घाबरले आणि गोंधळून गेले. या तरुणाला ट्रेनच्या मध्ये अडकलेलं पाहून आरपीएफ जवान भागवत बाजड हे देवासारखे आले आणि त्यांनी तातडीने आपल्या जीवाची पर्वा न करता या तरुणाला आपल्या दिशेने ओढले आणि त्याचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून. भागवत बाजड यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.