केंद्र सरकारकडून मदत करताना होणारा दुजाभाव लपून राहिलेला नाही : अजित पवार

गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (15:59 IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडून मदत करताना होणारा दुजाभाव लपून राहिलेला नाही, अशी टीका पूरग्रस्तांच्या मदतीवरुन मोदी सरकारवर केली आहे. आपण मागणी करताना साधरण जे काही नुकसान झालं असतं त्या अनुषंगाने मागणी करत असतो. किती निधी द्यायचा हा अधिकार केंद्राचा आहे, असं देखील अजित पवार म्हणाले. ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते.
 
“आपण मागणी करताना साधरण जे काही नुकसान झालं असतं त्या अनुषंगाने मागणी करत असतो. किती निधी द्यायचा हा अधिकार केंद्राचा आहे. एक गोष्टी खरी आहे की काही राज्यांनी न मागता तातडीची मदत म्हणून हजारो कोटींची मदत जाहीर केली. सर्वच राज्यांच्या बाबतीमध्ये एकसारखी भूमिका केंद्राने घेतली तर ते जास्त उपयुक्त ठरेल. भारत सरकार हे देशाचं सरकार असतं. राज्यासोबत भेदभाव करु नये. त्यांच्या निर्णयानंतर त्रयस्थांना, माध्यमातील लोकांना किंवा सहकाऱ्यांना पण वाटतं की याच्यात कुठेतरी भेदभाव होतोय, तसं होता कामा नये,” असं अजित पवार म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती