परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करावी याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. मात्र, अद्याप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले. झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एकत्र जमून त्यांनी धरणे आंदोलन केले. जोपर्यंत एमपीएससी वर्णनात्मक परीक्षेबाबत निर्णय घेणार नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. विद्यार्थी आंदोलन करत असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अचानक पोहोचले. रात्री ११ वाजता विद्यार्थ्यांशी संवाद साधून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी अनेकवेळा आंदोलने करुनही निर्णय घेतला नाही. त्यामुळे जोपर्यंत एमपीएससी वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून घेण्याचा निर्णय घेणार नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. यानंतर शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, विद्यार्थी शिष्टमंडळ बैठकीसाठी जाणार आहे. मात्र, एमपीएससी जोपर्यंत अधिकृतपणे नोटिफिकेशन काढणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकानी सांगितले.