Sharad Pawar Retirement: कोण होणार राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष? ही नावे चर्चेत

मंगळवार, 2 मे 2023 (17:31 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवार(sharad Pawar) यांनी केली आहे. तसेच यापुढे मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही असेही त्यांनी जाहीरपण सांगितले आहे.
 
मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला जिथे शरद पवारांनी ही घोषणा केली. 
 
शरद पवार यांनी कार्यक्रमात ही घोषणा करताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला आणि ते भावूक झाले. कार्यकर्त्यांनी शरद पवार आपला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत सभागृह सोडणार नाही असा पवित्रा घेतला.
 
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे तर कुठं थांबायचं हे मला माहिती आहे असे ते म्हणाले. मी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच बैठक बोलवणार असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आणि आता नव्या अध्यक्षाची चर्चा सुरु झाली आहे. या साठी काही नावे चर्चेत आहे. 

अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि प्रफ्फुल पाटील अशी नावे चर्चेत आहे. अजित पवार(Ajit pawar) हे आता शरद पवार हे निवृत्त झाल्यामुळे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.  

सुप्रिया सुळे(supriya sule) या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील नेत्या असून बारामतीच्या  खासदार आहे.त्या  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या कन्या असून त्यांचं  नाव  देखील चर्चेत आहे.

जयंत पाटील(jayant patil) हे देखील महाराष्ट्र राजकारणातील मोठे नेते असून राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहे. यांचं नाव देखील चर्चेत आहे. 

प्रफुल्ल पटेल (Prafful patel)हे महाराष्ट्रामधील एक मोठे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत.अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत. यांचं नाव देखील चर्चेत आहे. 
 
 
Edited By - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती