राज ठाकरे यांनी आजच्या भाषणातून शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली. मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केलेलं भाषण म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कानाखाली आवाज काढणारं ठरलं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
यावेळी ते म्हणाले की, “राज ठाकरेंनी आजच्या भाषणातून शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली. मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आज केलेलं भाषण म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कानाखाली आवाज काढणारं ठरल”
“भाजपा आजपर्यंत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांचा उद्देश साध्य करत होती. पण आता भाजपाचा भ्रमनिरास झाला असेल. निश्चितच देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते राज ठाकरेंच्या आजच्या भाषणामुळे अस्वस्थ झाले असतील, असं माझं मत आहे. राज ठाकरेंनी राज्यपाल यांनाही खडेबोल सुनावले आहेत. तसेच शिंदे गटाचा एक वाचाळवीर मंत्री अब्दुल सत्तार यांचीही कानउघडणी केली आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आजच्या भाषणातून बऱ्यापैकी भाजपाच्या तोंडात हाणलं आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.