पंतप्रधान मोदी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात

सोमवार, 4 डिसेंबर 2023 (08:04 IST)
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. भारतीय नौदल दिनानिमित्त तारकर्ली येथे होणा-या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ््याचे अनावरण करण्यात येणार आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदाजे ३.४० वाजण्याच्या सुमारास चिपी विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर ते राजकोट किल्ल्याकडे रवाना होतील. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ््याचे ते अनावरण करतील. त्याशिवाय पंतप्रधान सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत, तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकमेव मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.
 
पुतळ््याचे अनावरण झाल्यानंतर नरेंद्र मोदी तारकर्ली येथे नौसेना दिनानिमित्त होणा-या प्रात्यक्षिकांना हजर राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. यावेळी नौदलाकडून नौदल दिनाच्या निमित्ताने प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत.
 
पंतप्रधानांचा दौरा,
बाजारपेठा बंद राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यानिमित्त मालवण तारकर्लीतल्या बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्याशिवाय पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावर वाहतूक प्रतिबंध असणार आहेत. त्याशिवाय स्थानिकांच्या रहदारीवर निर्बंध असणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पंतप्रधान मोदी हे सिंधुदुर्गात असतील. स्वच्छता, सुशोभिकरण यांसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती