‘वर्षा गायकवाड हाय हाय…’, ‘इतर बोर्डाच्या शाळा बंद करा… बंद करा…

बुधवार, 27 जानेवारी 2021 (21:28 IST)
पुणे शहरातील खासगी शाळांकडून वाढवण्यात आलेली फी आणि इतर मागण्याचे निवेदन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पालकांच्या संघटनेनं दिलं.  मात्र गायकवाड यांच्याकडून यासंदर्भात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालक आक्रमक झाले. पालकांनी बालभारतीच्या कार्यालयासमोरच वर्षा गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ‘वर्षा गायकवाड हाय हाय…’, ‘इतर बोर्डाच्या शाळा बंद करा… बंद करा…’ अशा घोषणांनी पालकांनी बालभारती भवनाचा परिसर दणाणून सोडला. पालकांचा आक्रमक पवित्रा पाहून वर्षा गायकवाड यांनी पालकांचा समाना न करता थेट दुसर्‍या दाराने जाणं पसंत केल्याचं पहायला मिळालं.
 
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. खाजगी शाळांनी मनमानी पद्धतीने फी वसुल करु नये. यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली होती. मात्र त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे गायकवाड यांनी पालकांना सांगितले. त्यावर पालक संघटनांनी आक्रमक होऊन, वर्षा गायकवाड यांच्या विरोधात कार्यालयाबाहेर येऊन जोरदार घोषणाबाजी केली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती