अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे शरद पवारांना उत्तर

गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (09:01 IST)
फरक एवढाच आहे की मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. चाळीस वर्षानंतर सगळ पाच वर्षे मी मुख्यमंत्री राहिलो. पवारसाहेबही मोठे नेते आहेत ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले, पण ते सलग पाच वर्षे कधीच राहू शकले नाहीत. राहिले असते तर बरं झालं असतं, त्यांनी चांगलंच काम केलं असतं. पण त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना कधी दोन वर्षे, कधी दीड वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहता आलं. मला एका गोष्टीचं यावेळी समाधान आहे की, मी विरोधी पक्षनेता म्हणून देखील समाधानी आहे हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झालीय. हीच माझ्या कामाची पावती आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना उत्तर दिले आहे.
 
फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना ‘जनतेचं प्रेम पाहून मी अजुनही मुख्यमंत्री असल्याचं वाटतं’ असं वक्तव्य केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन जोरदार टोला लगावला आहे. तर पवारांच्या या टोल्याला देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती