केंद्र शासनाच्या वाणिज्य व ग्राहक मंत्रालयाने ऎन खरिपाच्या पेरणीपूर्वी दिलासदायक निर्णय घेतल्याने बाजारातील कांद्याचे दर सुधारतील अशी आशा निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांनी चाळीत साठवण केलेला कांदा बाजारात अथवा नाफेडच्या परवाना धारकास विक्री करुन येणाऱ्या खरिपाची बियाणे, खते खरेदी करता येणार आहेत.
नाफेड मार्फत खरेदी सुरु असल्याची बातमी मिळताच नाफेड मार्फत प्रती क्विंटल काय दराने खरेदी केली जाईल याबाबत शेतकऱ्यांकडून चर्चा करण्यात येत होत्या. त्यामुळे नाफेडने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चाचा विचार करुन योग्य दराने खरेदी केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अन्यथा पुन्हा कांद्याच्या दराबाबत शेतकरी प्रतिनिधी व संघटनांकडून आंदोलनात्मक भूमिका घेतल्या जातील असे चित्र आहे.