"एखादी कारवाई करण्यात येत असेल तर त्याविषयी अधिकृत प्रेस रिलीज ईडीने काढावं, फक्त 'व्हिस्परिंग कॅम्पेन्स' करत, मीडियामध्ये बातम्या पेरत महाराष्ट्रातल्या नेत्यांना, महाराष्ट्रातल्या सरकारला बदनाम करण्याचं काम बंद करावं," असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
तर किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलंय, "नवाब मलिक सध्या बोलत आहेत की, माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. माझे नवाब मलिकांना एक सांगणे आहे की, जर आपण घोटाळा केला असेल, पुणे वक्फ बोर्डाचा घोटाळा, जमिन गोंधळात आपले नाव असेल, तर आपल्या घरी सरकारी पाहुणे नाही येणार. तर आपल्यालाच सरकारचे पाहुणे बनावे लागणार."
या ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी म्हटलं होतं, "मित्रांनो, असं ऐकलंय की माझ्या घरी आज उद्यात सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करतो. घाबरणं म्हणजे रोजचं मरण, आम्ही घाबरणार नाही, लढणार आहोत. गांधीजी गोऱ्यांशी लढले होते, आम्ही चोरांशी लढणार आहोत."