Nagpur :घरातील अंगणात खेळता खेळता 5 वर्षाचा मुलाचा मृत्यू

सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (19:03 IST)
घरात लहान मुलं असले तर त्यांची खूप काळजी घ्यावीच लागते. मुलं खेळता खेळता काय करतील ह्याचा काही नेम नसतो. कधी कधी खेळताना लहान मुलांचा जीव देखील धोक्यात येतो. असे काहीसे घडले आहे नागपूर येथे. नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. घरात अंगणातील स्लायडिंग गेटवर खेळत असताना लोखंडी गेटचा नट निघाला आणि गेट अंगावर पडून चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रियांश टांगले असे या मृत्यूमुखी झालेल्या मुलाचे नाव आहे. 
 
रेयांश हा चिमुकला घरच्या अंगणात असलेल्या लोखंडी स्लायडिंग गेटवर लोम्बकळत असताना गेटवरील नट गळून पडला आणि गेट रेयांशचा अंगावर पडून तो गंभीररित्या जखमी झाला त्याला तातडीनं मेयो रुग्णालयात दाखल केले असताना त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.या घटनेमुळे टांगले कुटुंबियांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती