खासदार गावित यांच्यासह कार्यकर्ते आणि दुचाकीवरील जखमी महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रविवारी दुपारी नंदुरबार शहरातील गुरव चौक येथे हा अपघात झाला आहे. खासदार गावित आपल्या काही कार्यकर्त्यांसह कारने एका खासगी पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी जात होत्या, यावेळी हा अपघात घडला आहे. या अपघातात गावित यांच्यासह तीन कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.