पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या-ज्या राज्यात जातात तिथे ते राजभाषेत जनतेशी संवाद साधतात. मुंबईत आल्यावर ते मराठीतून भाषणाची सुरुवात करतात. आज ते बेळगावात आहेत. बेळगावात त्यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात करावी, असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.आज मराठी भाषा गौरव दिन आहे. त्याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी ट्विट करत मोदींना एकप्रकारे सल्ला दिला आहे.
राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मोदीजी ज्या राज्यात जातात तिथे स्थानिक भाषेत भाषणाला सुरूवात करतात. आज मराठी भाषा गौरव दिनी, पंतप्रधान बेळगावात आहेत. बेळगावात मराठीत भाषणाला सुरुवात करून त्यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर मराठी जनांना अभिमान वाटेल! कर्नाटक सरकारला एक कडक संदेश जाईल. पाहा जमतंय का!”