मार्डच्या संपावर तोडगा काढला, डॉक्टरांनी संप घेतला मागे

मंगळवार, 3 जानेवारी 2023 (20:24 IST)
मार्डच्या संपावर तोडगा काढण्यात अखेर यश आलं आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर बैठक पार पडली. या बैठकीनंतर मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेतल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. संपावर  तोडगा काढण्यासाठी गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत मार्डच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यापूर्वीच मार्डची वैद्यकीय शिक्षण संचालकांसोबत बैठक झाली होती. मात्र त्या बैठकीत तोडगा न निघाल्यामुळे आता मंत्र्यांसोबत चर्चा झाली. 
 
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील जवळपास सात हजार डॉक्टर संपावर गेले होते. आपल्या मागण्यांसाठी  मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने गिरीश महाजन यांची भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती