मोठा दिलासा : मराठा समाजाला EWS चा लाभ देणार

गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (10:44 IST)
मराठा समाजाला EWS चा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमेदवारांची होणारी फरफट लक्षात घेऊन ठोस पाऊल टाकण्यात आलं आहे. एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरता ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मराठा समाजासाठी हा खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती