Maharashtra anganwadi workers राज्यातील अंगणवाडी सेविका हा आतापर्यंतचा दुर्लक्षित कर्मचारी वर्ग होता. मिळणारे तुटपुंजे वेतन, कामाचा ताण, कमी भत्ता अशा अनेक कारणांमुळे अंगणवाडी सेविका त्रस्त होत्या. पण केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे.
मुंबईत झालेल्या प्रधानमंत्री मातृ वंदन योजना कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार यावेळेस उपस्थितीत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज लाखो महिला आणि बाळांचे सेवक झालेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाद्वारे 3 कोटी 50 लाख महिला याद्वारे जोडल्या गेल्या आहेत. या महिलाच्या खात्यात 14 हजार कोटी रुपये देण्यात आले असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले.