करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीला तिरुपती देवस्थानकडून येणाऱ्या दोन शालूंचा लिलाव झाला. गेल्या वर्षीच्या शालूला 77 हजार रुपये तर यंदाच्या शालूसाठी 5 लाख 5 हजार रुपयांची बोली लागली. मनिषा खोराटे यांनी 77 हजार रुपयाला तर सुभाष ऐमुल यांनी 5 लाख 5 हजार रुपयांना शालूची बोली लावत देवीचे महावस्त्र घेतले.दरवर्षी अंबाबाई देवीला तिरुपती देवस्थानकडून शालू येतो.
ह्या शालूची 75 हजारपासून बोली लावण्यात आली. केवळ दोन बोलीतच 77 हजार रुपये किमतीला हा शालू साखरेचे व्यापारी मनिषा खोराटे यांनी खरेदी केला. तर 2016 च्या शालूचा लिलाव 1 लाख 10 हजार रुपायांपासून सुरु झालेल्या बोलीने वाढत वाढत बांधकाम व्यवसायिक सुभाष ऐमुल यांच्यावतीने बोली लावणाऱ्या सिद्धेश राणे यांनी 5 लाख 5 हजार बोली लावली ही बोली अंतिम ठरली.