नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात एका चित्रपटाच्या शूटिंग करण्याची परवानगी देण्यात आली. या दरम्यान काहींनी या रुग्णालयात चक्क मद्यप्राशन केले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी याच रुग्णालयात ऑक्सिजनच्या गॅसगळतीमुळे 22 पेक्षा अधिक रुग्ण दगावले होते. आता या रुग्णालयात दारू पार्टी रंगल्यामुळे खळबळ माजली आहे.