लातूरमधील कीर्ती आॅईल मिलमध्ये सोमवारी रात्री वेस्टेज सेटलमेंट टँकमध्ये स्वच्छता करण्यासाठी उतरलेल्या नऊ कामगारांच्या मृत्यू प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कीर्ती आॅईल मिलचे मालक, ठेकेदार याच्यासह अन्य तिघे अशा पाचजणांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आॅईल मिलच्या मालकासह चौघांना अटक केली आहे. यात शिवराज पांडुरंग माने यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आॅईल मिलचे मालक कीर्तीकुमार विष्णुदास भुतडा, एकनाथ श्रीमंत केसरे, मनोज वसंतराव क्षीरसागर, अंगद बब्रुवान गायकवाड आणि मयत ठेकेदार राम नागनाथ येरमे यांच्याविरुद्ध कलम ३०४ (२), ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी सकाळी यातील चौघांनाही अटक केली आहे.