Jalgaon RL Jwellers Raid : जळगावातील राजमल लखीचंद हे नावाजलेले समूह आहे. या समूहाने एसबीआय बँकेकडून तब्बल 525 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होत. या कर्जाप्रकरणी ईडी कडून चौकशी केली जात असून ईडी कडून 90 लाख रोख रुपये आणि सोनं सील केलं आहे. या समूहाच्या आर्थिक दस्तावेज आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे देखील जप्त केली आहे. ईडी ने 17 ऑगस्ट रोजी जळगाव, ठाणे आणि नाशिकच्या आर एल ज्वेलर्स च्या 13ठिकाणावर छापेमारी केली आहे.
ईडी ने कर्जाच्या फसवणूक प्रकरणी आर एल ज्वेलर्स प्रा.लि. आर एल गोल्ड प्रा. लि. आणि मनराज प्रा. लि. आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवाणी , पुष्पा देवी,नीतिका मनीष जैन, आणि मनीष ईश्वरलाल जैन लालवाणी यांच्या कडे छापेमारी केली आहे.
या प्रकरणी ईडीने गुरुवारी या समूहाच्या 13 ठिकाणी छापेमारी करून ईडीच्या 25 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून तपासणीत 1.11 कोटी रोख रक्कम, आर्थिक दस्तऐवज, सोनं,विविध कागदपत्रे, 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोनं, आणि हिऱ्याचे दागिने, जप्त करण्यात आले असून हे सर्व जळगावच्या एसबीआयच्या मुख्य शाखेत जमा करणार आहे. सूत्रांनी अशी माहिती दिली.
राजमल लखीचंद समुहाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 525 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान या थकीत कर्जाप्रकरणी बँकेनं आणि आर. एल. समूहानं परस्परविरोधी दावे केल्यानं वाद सुरुय. स्टेट बँक ऑफ इंडियानं दिल्ली सीबीआयकडं तक्रार केली होती. त्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून आर. एल. समुहाची चौकशी केली जातेय. या प्रकरणी राजमल लखीचंद समुहाचे संचालक ईश्वरलाल जैन , मनीष जैन यांचे जबाब नोंदवून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.