जळगावच्या मेहरूण परिसरात जोशीवाडा कॉलोनीत नवरात्रोत्सवासाठी देवीची मूर्ती बसवण्याची तयारी झाली. मंडळाचे काही कार्यकर्ते देवीची मूर्ती बऱ्हाणपुरातून आणण्यासाठी शनिवारी गेले असता रात्री परत येताना पुराणाड फाट्या जवळ वाहनाचा अपघात झाला. या अपघातात संजयवर देवीची मूर्ती पडली. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
त्याच्या मृत्यूची त्याच्या कुटुंबियांना फोनने सूचना दिली. हे कळतातच त्यांनी हंबरडा फोडला. त्याच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ ,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार असून मयत संजय जळगाव एमआयडीसी च्या एकाच खासगी कंपनीत खिडक्यांच्या सेंटरिंगचे काम करत होता . मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात त्याच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू ची नोंदणी केली आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.