Goregaon : मराठी मालिकेच्या सेट वर शूटिंगच्या वेळी बिबट्या घुसला

सोमवार, 17 जुलै 2023 (15:41 IST)
सध्या गोरेगाव फिल्मसिटीत बिबट्याचा धुमाकूळ सुरु असून या परिसरात बिबट्याची दहशत आहे. या परिसरात बिबट्या सर्रास फिरताना आढळतात.या परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्यामुळे भीतीचे वातावरण आहे.

आता पुन्हा फिल्मसिटीत परिसरात बिबट्या दिसला आहे. एका मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसल्याची माहिती मिळाली आहे. बिबट्याला पाहून सेटवर उपस्थित लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 
गोरेगाव परिसरात असलेल्या फिल्मसिटीमध्ये एका मराठी मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरु असताना एक बिबट्या घुसला. त्याने कुत्र्यावर हल्ला केला. बिबट्याला पाहून सेटवर गोंधळ उडाला. 

सध्या गोरेगावच्या फिल्मसिटीत बिबट्याची दहशत कायम आहे. या भागात बिबट्या फिरताना दिसतो. बिबट्या कधी आणि कुठून येईल हे कोणीही सांगू शकत नाही.रात्री अपरात्री देखील या ठिकाणी शूटिंग होत असते. सेटवरील कलाकार आणि युनिटच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांच्या सुरक्षेची मागणी केली जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती