मातीशिवाय शेतीचा जुगाड, मातीविना फुलवली जरबेरा फुलशेती

शनिवार, 5 मार्च 2022 (18:24 IST)
कळंब तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी एक प्रयोग केला आहे. या शेतकऱ्यांनी मातीविना जरबेराच्या फुलांची शेती केली आहे. सुरुवातीला त्यांच्या या प्रयोगाला चेष्टेत घेतले नंतर जेव्हा त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला तेव्हा त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची राज्यासह संपूर्ण देशात चर्चा होत आहे. 
 
शीतल चव्हाण आणि दिनेश चव्हाण असे या यशस्वी शेतकऱ्यांचे नावे आहेत. हे उस्मानाबाद येथील कळंब तालुकाच्या बोर्डा येथील रहवासी आहे. यांनी पॉलिहाऊस उभारले आणि बेडच्या मदतीने मातीविना जरबेरा फुलशेती केली आहे. त्यांनी सुमारे 20 गुंठ्यामध्ये जेरेबेराची बाग फुलवली असून त्यांच्या हा प्रयोग यशस्वी झाला असून सध्या चर्चेचा विषय झाला असून चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.   
  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती