फडणवीसांनी मनाचा मोठे पणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं’- एकनाथ शिंदे

गुरूवार, 30 जून 2022 (21:40 IST)
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपक्षा दाखविला आहे. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. फडणवीस यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांचे नाव घोषित केले आहे. शिंदे यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर त्यांनी ही भावना व्यक्त केली.
 
शिंदे यावेळी म्हणाले की, भाजपने आम्हाला साथ दिली आहे. आमच्या भावना लक्षात घेतल्या आहेत. बाळासाहेब आणि त्यांच्या विचारांनी चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची संधी आता मिळत आहे. देवेंद्र फडणवीस हे जरी मंत्रिमंडळात राहणार नसले तरी ते आमच्या पाठिशी आहे. त्यांच्या विश्वासास पात्र ठरु, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
 
आम्ही शिवसैनिकच आहोत. जेव्हा पक्षाचे तब्बल ५० आमदार वेगळी भूमिका घेतात त्याची दखल पक्ष प्रमुखांनी घ्यायला हवी होती. त्यांनी ती घेतली नाही. जनतेच्या अपेक्षा आणि हिंदुत्वाच्या विचारधारेवरील सरकार कार्यरत ठेवण्यासाठी कटीबद्ध राहीन, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती