खळबळजनक ! बुलडाण्यात स्टेटबँकेवर दरोडा , चोरटयांनी तिजोरीतून 20 लाखापेक्षा अधिक रुपये लुटून नेले

शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (15:21 IST)
बुलडाणाच्या चिखली तालुक्यातील केळवद येथील स्टेटबॅंकेच्या शाखेवर दरोडेखोऱ्यानी दरोडा टाकून तब्बल 20 लाख रुपयांपेक्षा अधिक रुपये चोरून नेले. ही घटना आज सकाळी बँकेच्या शिपायाने बँक उघडल्यावर उघडकीस आली. त्याने ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. अधिकाऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना बोलावले. घटनास्थळी पोलीसचे वरिष्ठ अधिकारी श्वान पथकासह दाखल झाले असून तपास करत आहे . घटनास्थळापासून बँकेच्या बाजूला लागून असणाऱ्या शेतमार्गावर दरोडेखोरांचे हातमोजे आणि बेटरी मिळाली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज ने तपास करत आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार चोरटयांनी रात्रीच्या वेळी काळोखाचा फायदा घेत चोरटयांनी खिडकीचे गज वाकवून बँकेत शिरले आणि गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी कापली आणि त्यातून 20 लाखापेक्षा अधिकची रकम पळवून नेली. सकाळी बँकेत शिपाईने आल्यावर वाकलेले खिडकीचे गज बघून त्याला दरोडा होण्याचा संशय आला .त्याने ही घटना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. त्यांनी तातडीने घटनास्थळी दखल घेत पाहणी केली आणि त्यांना दरोडा पडल्याचे लक्षात आले त्यांनी पोलिसांना कळविले पोलीस उपविभागाचे अधिकारी सचिन कदम, बुलडाणा स्थानिक गुन्हशाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे हे घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस तपास करीत आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती