जयंत पाटील यांच्याशी संबंधित राजारामबापू सहकारी बॅंकेवर सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापा

शनिवार, 24 जून 2023 (21:26 IST)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित राजारामबापू सहकारी बॅंकेवर सक्तवसुली संचलनालयाने (ED)  छापा टाकला. या बॅंकेत दहा वर्षांपूर्वी एक हजार कोटींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा ED ला संशय आहे. या बॅंकेसोबतच ED ने सांगलीतील १४ ठिकाणी छापेमारी केली आहे.
 
राजारामबापू बॅंकेसह चार्टर्ड अकाऊंटंटवरही ED ला संशय आहे. चार्टर्ड अकाऊंटंटच्या मदतीने काही कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याची ED ची माहिती आहे.
बॅंकेत काही खाती बोगस केवायसीच्या सहाय्याने काढण्यात आली. या खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्यात आली. ती रक्कम नंतर काढण्यात आली. यासाठीही चार्टर्ड अकाऊंटंटने मदत केली. या व्यवहरांचा तपशील बॅंक देऊ शकली नाही, असा ED चा दावा आहे.  याप्रकरणी जीएसटी विभागाने २०११ मध्ये तक्रार केली.
 
कंपन्यांची बोगस बिलं, पावत्या तयार करण्यात आल्या. याद्वारे राजारामबापू साखर कारखान्यातील रक्कम वर्ग करण्यात आली. चार्टर्ड अकाऊंटंटने कमिशन घेऊन ती रक्कम रोखी स्वरुपात दाखवली, असा आरोप ईडीने केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती