चक्कर येऊन तरुणी धावत्या ट्रेन मधून पडली सुदैवाने बचावली

रविवार, 10 मार्च 2024 (13:06 IST)
ट्रेन मध्ये चढताना आणि उतरताना नेहमी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिला जातो. तसेच ट्रेनच्या दारावर कोणी उभे राहू नये असा सल्ला देखील दिला जातो. तरीही प्रवाशी दरामध्ये उभे राहतात आणि आपला जीव धोक्यात घालतात.कधी कधी दारावर उभे राहिल्याने अपघात होतात.

असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ठाण्याचा आहे. ठाण्यातील भाईंदर रेल्वे स्थानकावर चर्चगेट ते विरार लोकल मधून एक तरुणी दारात उभे राहून प्रवास करत होती. अचानक तिला चक्कर आली ती धावत्या गाडीतून खाली पडली. ती गाडी खाली येणार की अचानक तिथे असणारे पोलीस एकनाथ माने आणि पोलीस चव्हाण यांनी धावत जाऊन या तरुणीचा जीव वाचवला.  

झाले असे की एक तरुणी लोकल मध्ये दारात उभे राहून प्रवास करत होती. अचानक तिला चक्कर आली आणि ती ट्रेनच्या खाली येणार तेवढ्यात तिथे असलेल्या दोन पोलिसांनी प्रसंगावधान राखत तिला हात खेचून दूर केले आणि तिचे प्राण वाचवले. सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झाली नाही. पोलिसांमुळे तिचे प्राण वाचले त्यासाठी तिच्या आई वडिलांनी वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती