या १० बँकांचे चार बँकांमध्ये होणार एकत्रीकरण

गुरूवार, 5 मार्च 2020 (17:10 IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील आणखी १० बँकांच्या एकत्रीकरणाला मंजुरी दिली आहे. १० बँकांचे एकत्रीकरण करून ४ बँका अस्तित्वात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. येत्या एप्रिलपासून एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
 
बुधवारी घेतलेल्या निर्णयानुसार, पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या तीनही बँकांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. त्यातून अस्तित्वात येणारी बँक ही एसबीआयनंतरची देशातील दुसरी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचे विलीनीकरण होईल.
 
त्यातून अस्तित्वात येणारी बँक देशातील चौथी सर्वात मोठी बँक असेल. तसेच इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेचे एकत्रीकरण होणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती