गेल्या साडेतीन महिन्यांपासून राज्यातील राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. शिवसेनेत मोठी बंडखोरी आणि नंतर राज्यात सत्तापालट... त्यामुळे राज्याच्या राजकारणात असा काय खेळ सुरू आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. हाच प्रश्न राजकारण्यांसह जनतेच्याही मनात असेल. मात्र, सध्यातरी राजकीय वातावरण शांत होताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुट्टी घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शेतात त्यांनी लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, पंखा, चिकू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मिरची, हळद तसेच लाल चंदन, गवत चहा अशा विविध प्रकारची झाडे लावून संपूर्ण शेत फुलवले. मुख्यमंत्र्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते त्यांच्या गावी जाताना दिसतात.