मुंबई : शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यांच्या 1 ते 15 तारखेपर्यंत आदेश जारी केले आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामधील शांतता, कायदा आणि सुव्यवस्था, दंगल, मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती आणि विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. जमावबंदीसह मुंबई पोलिसांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
महाराष्ट्र पोलीस कायद्यामधील कलम ३७ नुसार लागू करण्यात आलेल्या या प्रतिबंधात्मक आदेशामुळे पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही. त्याचबरोबर कुठल्याप्रकारच्या मिरवणुका काढता येणार नाहीत. या मिरवणुकांमध्ये फटाके फोडणे, लाऊडस्पीकर्स लावणे आणि म्युझिक बँडला देखील बंदी असणार आहे. यामध्ये लग्न समारंभ आणि अत्यंयात्रा यांना वगळण्यात आले आहे.